

पिंपरी (Pclive7.com):- नेवाळे वस्ती, पूर्णा नगर प्रभाग क्रमांक ११ मधील संवेदनशील नेतृत्व, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व निलेश मधुकर नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.२८) भव्य रोजगार मेळावा आणि (दि.२९) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नेवाळे वस्ती, पूर्णा नगर (प्रभाग क्रमांक ११) मधील भाजपाचे अभ्यासू नेतृत्व निलेश नेवाळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात २००० हुन अधिक विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन चेरीज चौक, आरंभ हॉटेल शेजारी, स्पाईन रोड, पूर्णानगर येथे करण्यात आले आहे.

तसेच (प्रभाग क्रमांक ११) नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे, शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, त्वचारोग तपासणी यासह विविध तपासण्या अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त चेरिज चौक, आरंभ हॉटेल शेजारी स्पाईन रोड, पूर्णानगर येथे सोमवार दि.२९ रोजी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी प्रभाग क्रं.११ मधील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group