

लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाने केले होते आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- शंखनाद, कानुबाई मातेची सुंदर गाण्यांचे सादरीकरण, देवीची महाआरती आणि सोबतच फुगड्या अन् गरबा खेळण्याचा आनंद…. अशा कार्यक्रमांनी रहाटणी येथे सोळा कुलस्वामिनी व कानुबाई मातेचा जागर करण्यात आला. या सोहळ्यात असंख्य भगिनींच्या सहभागाने स्त्रीशक्तीचाही जागर झाला.

रविवारी (दि. २८) रहाटणीतील विमल गार्डन येथे लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील लाडशाखीय वाणी समाज बांधव मोठ्या संख्येने सोहळ्यात सहभागी झाले. शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासजी वाणी, धुळे येथील महाराष्ट्र वाणी युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी पाचपुते , गुजरात येथील स्कायओरा स्टिकस्चे मॅनेजिंग डायरेक्टर अंकिशकुमार पटेल, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, बांधकाम व्यावसायिक नितीन देव, उद्योजक सचिन सोनकुळ, बी. एन. वाणी, आमदार शंकरशेठ जगताप, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विरोधी पक्षनेते नाना काटे, उन्नती फाउंडेशनच्या कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, गणेश कस्पटे, मोरेश्वर शेडगे कैलास सानप, माऊली जगताप, जयनाथ काटे, अमित पसरणीकर, गणेश वाळुंजकर, संदेश काटे, कैलास बारणे, पियुषा पाटील, श्वेता कापसे, कल्पना बागुल , सागर बिरारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘केशव’ शंखनाद पथकाने शंखनाद करुन झाली. महाआरतीनंतर शिरपूर-धुळे येथील कानुबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुपच्या कलाकारांनी कानुबाई मातेची गाणी सादर केली. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कुलस्वामिनी आईच्या जोगव्याने सोहळ्याची सांगता झाली.

लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज ब्राम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व सदस्यांनी संयोजन केले. मंडळाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा प्रिती कोठावदे, उपाध्यक्ष योगिता फुलदेवरे, माधुरी वाणी, अर्चना ब्राम्हणकार, माधुरी ततार, संघटन प्रमुख संगिता लाड, सोनल बधान, स्वाती अमृतकर यांनी सोहळ्याची उत्तम तयारी केली.
























Join Our Whatsapp Group