
पिंपरी (Pclive7.com):- विद्या भारती पुणे जिल्ह्याच्या वतीने शनिवार दि.११ ऑक्टोबर रोजी विद्यादानाचे मौल्यवान कार्य करीत असतांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विशेष योगदान देणाऱ्या शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचा केरळचे माननीय राज्यपाल राजेंद्रजी अर्लेकर यांचे हस्ते विशेष पुरस्कार देऊन सन्मान केल्या जाणार आहे.

‘सा विद्या या विमुक्तये’ हे ब्रीद असलेल्या विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान या संस्थेच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने विद्यादानाचे मौलिक कार्य करणाऱ्या संस्थांचे संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच पालक प्रतिनिधी यांच्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर केरळचे माननीय राज्यपाल राजेंद्रजी अर्लेकर मार्गदर्शन करणार असून तत्पूर्वी त्यांच्या हस्ते संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार २०२५ चे वितरण होईल.

शनिवार दि.११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ दरम्यान शहरातील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह आकुर्डी प्राधिकरण येथे होणाऱ्या या महत्वपूर्ण कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक डॉ.सुरेश तथा नानासाहेब जाधव, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, विद्याभारतीचे प्रांत मंत्री रघुनाथ देवीकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असून स्वागत समितीतील एस.बी.पाटील, डॉ. डी. के.भोसले, डॉ.मनोज देवळेकर, डॉ.अश्विनी कुलकर्णी, विश्वनाथ नायर, डॉ.निवेदिता एकबोटे, ॲड.राजेंद्रकुमार मुथा, ॲड.एस.के.जैन हे मान्यवर देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ.अशोक नगरकर व प्रवीण पोळ विद्या भारती यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group