
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे एक वाळूने भरलेला ट्रक रस्त्यावरून जात असताना उलटला आहे. हा ट्रक पलटी झाल्यामुळे वाळू आणि ट्रकखाली अनेक वाहने दबली आहेत. या दुर्घटनेत एक जण किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या एका नेत्याच्या घराचे बांधकाम सध्या संत तुकाराम नगर पिंपरी येथे सुरू असून त्याच्या बांधकामासाठी जाणाऱ्या वाळूचा ट्रकचे चाक चेंबर मध्ये अडकून ट्रक उलटला आहे. या ट्रकच्या खाली अनेक वाहने दबली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एका युवकाच्या पायाला देखील दुखापत झाली आहे.























Join Our Whatsapp Group