
पिंपरी (Pclive7.com):- पत्नीला वारंवार फोन करून त्रास दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. १२) रात्री अंकुश चौक, निगडी येथे घडली. याप्रकरणी मुजाहिद मुनावर पटवेगर (२७, रा. कोंढवा, पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, आयसान अहमद (२२, रा. ओटास्कीम, निगडी) आणि अल्तमश खान (२३, रा. ओटास्कीम, निगडी) यांच्यासह इतर दोन अनोळखी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयसान हा फिर्यादी मुजाहिद यांच्या पत्नी आशिया हिला वारंवार फोन करून त्रास देत होता. याबाबत फिर्यादींनी आयसानला फोन का करतोस, असे विचारले असता, त्याने फिर्यादीस अंकुश चौक निगडी येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी मुजाहिद आणि त्यांचा मित्र मोहसिन शमशुद्दीन शेख यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. निगडी पोलिस तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group