
पिंपरी (Pclive7.com):- दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतषबाजी आलीच. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एका रिल्स स्टारला फटाक्यांच्या दुकानाचे ‘हटके’ आणि ‘गुन्हेगारी’ पद्धतीने प्रमोशन करणे चांगलेच महागात पडले आहे.

वाकड पोलिसांनी या प्रमोशन करणाऱ्या रिल्स स्टारला पोलीस ठाण्यात बोलावून चांगलीच समज दिली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यवसायासाठी प्रमोशन महत्त्वाचे झाले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी फटाक्यांची दुकाने थाटली असून इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरातबाजी सुरू आहे. वाकड परिसरातील एका तरुणाने आपल्या फटाक्यांच्या दुकानाचे प्रमोशन करण्यासाठी चक्क गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारा एक व्हिडिओ बनवला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पोलिसांपर्यंतही पोहोचला. या व्हिडिओची गंभीर दखल घेत वाकड पोलिसांनी तातडीने संबंधित रिल्स स्टारला पोलीस ठाण्यात बोलावले. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ बनवून त्याद्वारे व्यवसायिक जाहिरात करणे हे गंभीर कृत्य असल्याचे सांगत पोलिसांनी त्याला कडक शब्दांत समज दिली आहे.























Join Our Whatsapp Group