
पिंपरी (Pclive7.com):- अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आधारस्तंभ व प्रेरणास्थान अनिता नानासाहेब शितोळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कृष्णाई महिला भजनी मंडळ व अरविंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या २५ ऑक्टोबर रोजी नवी सांगवीतील आरती लॉन्स, साई चौक येथे होणार आहेत.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या भजनी मंडळाला ११ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकास ९ हजार ९९९ रुपयांचे पारितोषिक, तर तृतीय क्रमांकास ७ हजार ७७७ रुपये पारितोषिक, तसेच विजेत्या तिन्ही क्रमांकाच्या भजनी मंडळांना सन्मानचिन्ह व प्रत्येक सहभागी भजनी मंडळाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

भजनी मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता ७३२३०००३६९ या संपर्क साधून मंडळाची नाव नोंदणी करण्याचे आवाहन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group