पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील स्मार्ट सिटी विभागाच्या रस्ता कॉंक्रिटकरण कामाची भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केली पाहणी. यावेळी त्यांनी कामाची गती, गुणवत्ता आणि नागरिकांना होणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ट्रायोज सोसायटी रस्त्याची देखील काटे यांनी यावेळी पाहणी केली.

यावेळी शत्रुघ्न काटे यांनी संबंधित पालिका अधिकारी यांना सांगितले की, “नागरिकांना होणाऱ्या वाहतुकीच्या व प्रवासाच्या अडचणी तातडीने दूर होणे गरजेचे आहे. जर ट्रायोज रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात काही तांत्रिक कारणास्तव विलंब होत असेल किंवा अडचणी निर्माण होत असतील, तर तात्पुरत्या स्वरूपात सदर रस्ता डांबरीकरण करून नागरिकांना सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्याय विचारात घ्यावा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. “रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असतात. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होणे ही आमची प्राथमिकता आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे.”

कुणाल आयकॉन रस्ता पाहणी वेळी शत्रुघ्न काटे म्हणाले की, “पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. येथील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता हा रस्ता कॉंक्रिटकरण केल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल. या भागातील नागरिकांना अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ रस्त्यांचा लाभ मिळणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सोयी-सुविधा वाढविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”



















Join Our Whatsapp Group