पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरक्लब “T-20” पिंपरी चिंचवड करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.०४ नोव्हेंबर २०२५ पासून फोर स्टार क्रिकेट ॲकेडमी हिंजवडी येथील मैदानावर या स्पर्धा होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी दिली आहे.

या स्पर्धेत विजयी संघाला रोख रक्कम रूपये २५,०००/- व चषक देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाच्या संघाला रक्कम रूपये १५,०००/- व चषक व तृतीय क्रमांकासाठी रक्कम रूपये ५,०००/- व चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ठ फलंदाज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फिल्डर, उत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू अशी विशेष बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा बाद पध्दतीने खेळवण्यात येणार आहे.
तरी इच्छुक क्लबने दि.२२ ऑक्टोबर पुर्वी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी करावी असे आवाहन जगदीश शेट्टी यांनी केले आहे. या स्पर्धेमधूनच जानेवारी मध्ये होणाऱ्या पिंपरी चिंचवड प्रिमिअर लीग स्पर्धेच्या ऑक्शनकरिता खेळाडूची निवड करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत पिंपरी चिंचवड परिसरातील क्रिकेट क्लब तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या अंतर्गत येणारे (आळंदी, तळेगाव, देहुरोड, माण, हिंजवडी, चाकण) या परिसरातील क्रिकेट क्लब स्पर्धेत सहभागी होऊ शकतील असे उपाध्यक्ष वसंतभाऊ कोकणे यांनी कळविले आहे.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजू कोतवाल: मो. नं. ९९२२५०२४१४ व मुकेश गुजराथी :- मो. नं. ९८२२७८१९१४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



















Join Our Whatsapp Group