पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील हॉटेल किर्याड बँन्क्वेटस हॉल येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे दीपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे हे ४ थे वर्ष आहे. प्रतीवर्षी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येत आहे.या वर्षी सर्व धर्म दीपावली सन्मान सोहळा हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील, विविध धर्मातील कर्तुत्वान व्यक्तींचा महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले पगडी, शाल, उपरणे, सन्मानचिन्ह, इंदिरा गांधी यांचे पुस्तक, मिठाई, पुष्पगुच्छ देऊन डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे (वारकरी संप्रदाय), मौलाना अब्दुल गफार अन्सारी (धार्मिक विभाग), पूज्य भन्ते राहुलजी (धार्मिक विभाग), सुधीरजी पारकर (धार्मिक विभाग), सावनी रवीन्द्र (पार्श्वगायिका), डॉ.वसंतराव चाबुकस्वार सर (शैक्षणिक विभाग), पी.व्ही. भास्करनजी (सामाजिक विभाग), माधवजी सहस्त्रबुद्धे (प्रिंट पत्रकारिता), शाहीर बापू पवार (कला विभाग), हाफीज आझमतखान पठाण (धार्मिक विभाग), अश्विनी सातव/ डोके( मुक्त पत्रकारिता), सुरेशजी विटकर (योगसाधना), राजेश तिवारी (उद्योजक), रमेश उमरगे अण्णा – न्यायाधीश लोकादालत, शिवाजीनगर कोर्ट, पुणे (कायदा विभाग), रघुनाथजी मोरे (निवृत्त पोलीस अधिकारी), शशी धरनजी नायर (कृष्ण मंदिर अध्यक्ष निगडी) या मान्यवरांचा सन्मान शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, अखिल भारतीय कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, माजी महापौर कवीचंद भाट यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात आपलले मनोगत व्यक्त करताना डॉ. कैलास कदम यांनी शहर काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन शहरातील वरील प्रमाणे मान्यंवर उपस्थित राहिले त्यांचे आभार व्यक्त केले व त्यांच्या पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वच मान्यंवर शैक्षणिक धार्मिक, वारकरी संप्रदाय, पत्रकारिता, न्यायव्यवस्था, आरोग्य, इतर क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा सन्मान पक्षाच्या वतीने करताना अध्यक्ष म्हणून मला आनंद होत आहे, गेल्या काही वर्षापासून जाणून-बुजून धर्मा-धर्मात जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत म्हणून सर्वधर्म हा विचार घेऊन चालणाय्रा काँग्रेस पक्षाची सर्व समाज घटकास समान न्याय हक्क देण्याची मोठी जबाबदारी आहे.

दिवाळी सण म्हणजे सर्वधर्मसमभाव जपणे हाच खरा दीपोत्सव आहे, समतेचा विचार घेऊन सर्वांना एकत्र घेऊन सामाजिक सलोखा जपण्यासाठी, आम्ही सर्व एक आहोत हा संदेश देण्यासाठी पक्षाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारातून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेली, आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका परंतु आज 15000 कोटी पेक्षा जास्त कर्जाचा बोजा हा करदात्या नागरिकांवर आहे, दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना शहरवासीयांना तोंड द्यावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे असेही डॉ. कैलास कदम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
पृथ्वीराज साठे यांनी मनोगत व्यक्त केले. सन्मानार्थी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये पत्रकारितेत अनेक वर्ष पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल ज्यांनी पाहिली असे जेष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे ,मा .अश्विनी सातव डोके , डॉ.भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ.वसतंराव चाबुकस्वार सर, सावनी रवीन्द्र यांच्या मातोश्री डॉ. वंदनाताई गांगर्डे, मोलाना अब्दुल गफार अन्सारी, सुधीर पारकर, या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर पक्षाचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर सन्मानार्थी यासर्वांनी एकत्रित बसून दीपावली फराळाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप यांनी केले, सूत्रसंचालन वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल यांनी केले, व आभार चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी यांनी मानले.
यावेळी शामलाताई सोनवणे, बाबासाहेब बनसोडे, निर्मलाताई खैरे, अर्चनाताई राऊत, जन्नताई सय्यद, डॉ. मनीषाताई गरुड, अमर नाणेकर विठ्ठल शिंदे, वाहब शेख, जॉर्ज मेथ्यु, भाऊसाहेब मुकुटमल, बाबूलाल वाघमारे, महेश पाटील, अण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, हिरामण खवळे, रवी कांबळे, योगेश भैरट, सचिन गायकवाड, रवी नांगरे, मजहर खान, फिरोज तांबोळी, अमरजीत सिंग, ऍड अनिकेत रसाळ, गौरव चौधरी, मिलिंद फडतरे, मकरध्वज यादव, ॲड.अनिरुद्ध कांबळे, आकाश शिंदे, बाबासाहेब वाघमारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group