पिंपरी (Pclive7.com):- विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात साहित्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ४ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवले जाणार आहे.

हे प्रदर्शन नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे आयोजित केले आहे. तसेच आमदार अमित गोरखे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता राजर्षी शाहू क्रीडांगण येथे होणार आहे.

तीन दिवसांचे चालणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी १० वाजता सुरू होऊन सायंकाळी ८:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ज्यामुळे नोकरी करणारे आणि विद्यार्थी या दोघांनाही आपल्या सोयीनुसार प्रदर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल. कवितासंग्रह आणि कादंबरी यांसारख्या लोकप्रिय साहित्यासह विविध विषयांवरील पुस्तके एकाच छताखाली वाचकांसाठी उपलब्ध असतील. शहराच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनात लाखो पुस्तके असतील, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.

























Join Our Whatsapp Group