
पिंपरी (Pclive7.com):- किवळे, रावेत, मामुर्डी, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी, विकास नगर आणि साईनगर येथील पाणीपुरवठा, रस्ते, कचऱ्याच्या समस्यांवरून मावळ लोकसभा युवासेना अध्यक्ष राजेंद्र तरस हे आक्रमक झाले आहेत. प्रभागातील समस्या तातडीने सोडवाव्यात या मागणीसाठी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

किवळे, रावेत प्रभागात झपाट्याने नागरीकरण होत आहे. मोठ मोठे गृहप्रकल्प याठिकाणी होत आहेत. लोकसंख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने महापालिका प्रशासनाने या प्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. या प्रभागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा या भागात केला जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न असून पावसाळ्यात अक्षरशः चिखलातून जीवघेणा प्रवास नागरिकांना करावा लागत आहे. या प्रभागात कचऱ्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

नागरिकांच्या या समस्या सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणूनच राजेंद्र तरस यांनी आक्रमक पवित्र्या घेतला आहे. प्रभागातील समस्यांचे बॅनर त्यांनी परिधान करून थेट ब प्रभाग कार्यालयात लक्षवेधी आंदोलन केले. आमचा प्रभाग महापालिकेत आहे? ग्रामपंचायत मध्ये नाही..? असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित केला. यावेळी उपायुक्त श्री. सरगर साहेब यांच्या समवेत त्यांनी या समस्यांवर गंभीरपणे चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रभागात प्रत्यक्ष पाहणी करून सर्व समस्या सोडवल्या जातील असे ठोस आश्वासन दिले.

किवळे रावेत, मामुर्डी, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी, विकास नगर आणि साईनगर येथील सर्व महत्त्वाच्या समस्यांचे लवकरच निराकरण केले जाईल. कमी दबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित पाणी, खड्डेमय रस्ते आणि वेळेवर कचरा उचलणाऱ्या गाड्यांची समस्या पूर्णपणे सोडवली जाईल. जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.
– राजेंद्र तरस, अध्यक्ष, युवासेना मावळ लोकसभा






















Join Our Whatsapp Group