पिंपरी (Pclive7.com):- श्रीक्षेत्र देहू येथून आज कासारवाडी मध्ये आलेल्या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुसते स्वागतच केले नाही, तर या पालखीरथाचे काहीकाळ त्यांनी सारथ्यही केले. त्यामुळे ते सोहळ्याचे एक आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला.
आमदार जगताप हे वारकरी कुटुंबातील आहेत. त्यांची ही परंपरा त्यांचे आमदार लक्ष्मण जगताप हे पुढे चालवित आहेत. कुटुंबाचा भक्ती संप्रदायाचा वारसा आमदार जगताप पुढे चालवित आहेत. शहरात मुक्कामी आलेल्या तुकोबारायांच्या पालखीरथाचे त्यांनी सारथ्य केले. खासदार अमर साबळे हे सुद्धा त्यांच्याबरोबर होते.
यावेळी आमदार जगताप यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पालखीची आरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी करण्यात आली होती.






















Join Our Whatsapp Group