पिंपरी (Pclive7.com):- रविवारी पहाटे चारच्या सुमारास कोल्हापुरच्या दिशेने निघलेली खासगी बस मुळा नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळली. बसमध्ये तीस प्रवासी होते पैकी १० प्रवाशी जखमी झाले आहेत. हा प्रकार वाकड येथे घडली. पुलाच्या कठड्याला बस अडकल्याने मोठी हानी टळली. यामध्ये बेलापुर न्यायालयाच्या न्यायाधीश चंद्रशिला पाटिल आणि त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरा पाटिल या मायलेकी गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली ते कोल्हापूर अशी एम.बी.लिंक ट्रँव्हसची बस (एम एच ०९-सी व्ही, ३६९७ ) कोल्हापूरच्या दिशेने जात होती. वाकड येथील मुळानदीचे पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण १० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंजवडी पोलिस पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group