
चिखली (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ मधील चिखली, शरद नगर आणि सुदर्शन नगर परिसरात भाजपाचे युवा नेतृत्व निलेश मधुकर नेवाळे यांच्या पुढाकारातून आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने घरगुती MNGL गॅस पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

चिखली, नेवाळे वस्ती, पूर्णानगर प्रभाग क्र.११ मधील भाजपचे संयमी आणि अभ्यासू नेतृत्व अशी निलेश नेवाळे यांची ओळख आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश नेवाळे विविध उपक्रम तसेच सुविधा नागरिकांकरिता उपलब्ध करून देत असतात.

शरदनगर, सुदर्शननगर चिखली येथे घरगुती MNGL गॅस पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या पाठपुराव्यातून करण्यात आला. बऱ्याच दिवसापासून घरगुती गॅस पाईप लाईनची मागणी या परिसरातील नागरिकांची होती. सदर काम मार्गी लागल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.
या MNGL गॅस पाईपलाईन कामाच्या शुभारंभ वेळी शरदनगर आणि सुदर्शननगर मधील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विशेषतः गृहिणीमधे मोठा उत्साह दिसून आला. याप्रसंगी प्रभाग क्र.११ मधील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group