पिंपरी (Pclive7.com):- बिहार निवडणुकीमध्ये येथील नागरिकांनी राज्याचा विकास, स्थिरता आणि मुख्य म्हणजे भाजपच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. या विजयाचे प्रतिबिंब महाराष्ट्रात देखील उमटणार आहे यात कोणतीही शंका नाही असे मत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी बिहार निवडणुकीनंतर व्यक्त केले. आजच्या विजयाचे मुख्य कारण सुशासन, लोकांचा प्रचंड विश्वास आणि बिहारमध्ये सुधारलेली कायदा व्यवस्था हेच असू शकते असेही जगताप म्हणाले.

बिहार राज्याच्या निवडणुकीमध्ये भाजपा प्रणित एनडीए सरकारला “न भूतो न भविष्यती” असा प्रतिसाद मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी केले. याच निर्णयाचे प्रतिबिंब महाराष्ट्रात आणि मुख्यत्वे पिंपरी चिंचवड मध्ये दिसेल असेही निवडणूक निकालानंतर जगताप यांनी म्हटले आहे.

शंकर जगताप पुढे म्हणाले बिहार राज्याच्या निवडणुकीत जनतेने विकास, स्थैर्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत भाजप-प्रणीत एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमताने विजयी केले आहे. हा विजय केवळ निवडणुकीचा नाही, तर बिहारच्या जनतेने दिलेला विकासाच्या मार्गावरील ठोस विश्वास आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बिहारची सुधारलेली कायदा व्यवस्था हा यातील मुख्य मुद्दा आहे.गंगा पथ रिव्हर फ्रंट,पाटणामध्ये मेट्रो यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले गेले. एनडीए सरकार लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. या उलट महागटबंधनने केवळ आपले नेते आणि कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याने बिहारच्या जनतेने यांना साफ नाकारले आहे.

शंकर जगताप पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांचा आणि सुशासनाचा लाभ राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला. त्याचेच फलित म्हणजे बिहारच्या मतदारांनी पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीए सरकारच्या हातात राज्याची धुरा सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून हिंसाचार, भ्रष्टाचार आणि अराज्य पासून मुक्तता मिळाली आहे. आता बिहार 3.0 होण्याची वेळ आहे.यातून औद्योगीकरण आणि स्टार्टअप उभे राहतील. गुणवत्तापूर्ण शिक्षण, औद्योगीकरण आधारित प्रणाली, गुंतवणूक आणि राज्यात रोजगाराचे मॉडेल असेल असा विश्वास आहे.
भाजपबद्दल वाढलेल्या विश्वासाचा विजय..
हा विजय देशभरातील मतदारांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक असून, भविष्यातील अधिक मजबूत आणि सक्षम भारताची पायाभरणी करणारा आहे.या विजयासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो. हेच विजयाचे चित्र पिंपरी चिंचवड मध्ये दिसेल.
– शंकर जगताप
निवडणूक प्रमुख, पिंपरी चिंचवड.























Join Our Whatsapp Group