
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आजक्षदि.१५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली महासभा येत्या ३० ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तर ऑगस्ट महिन्याची तहकूब महासभा २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय पुन्हा चर्चेत आला असून २० नोव्हेंबरच्या सभेत त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.

आजच्या महासभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री मधू कांबीकर तसेच कोकणातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आळंदी येथील विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्यास भाऊसाहेब भोईर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आजची महासभा तहकूब करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली स्वीकृत सदस्यांची निवड आता दिवाळीनंतर, म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपकडून स्वीकृत सदस्यांकरिता अनेकजण इच्छुक असून वरिष्ठ पातळीवरून काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादीकडून पूर्वीची तीन नावे येतात की, त्यात काही बदल होतोय याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group