
नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या संकल्पनेतून आयोजन; शनिवारी विविध स्पर्धा आणि ९ नारीशक्तींचा सन्मान
पिंपरी (Pclive7.com):- नवरात्रोत्सवानिमित्त पिंपळे सौदागर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दांडिया आणि गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभागातील विद्यमान नगरसेविका सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या संकल्पनेतून आणि निलेश काटे युवा मंचाच्या वतीने हा महोत्सव १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत आयोजित करण्यात आला आहे.

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई लेन येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे. परिसरातील नागरिक, महिला, युवक-युवती आणि कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शनिवारी विविध स्पर्धांची रंगत..
शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत भव्य दांडिया-गरबा खेळण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. यावेळी गरबा डान्स स्पर्धा, दांडिया स्पर्धा, बेस्ट कपल डान्स आणि बेस्ट ड्रेसिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

नऊ नारीशक्तींचा विशेष सन्मान..
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ नारीशक्तींचा सन्मान सोहळा. महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या योगदानाची दखल घेणे आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

निलेश काटे युवा मंचाच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे पिंपळे सौदागर परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक वाढणार असून, सांस्कृतिक परंपरा, मनोरंजन आणि महिला सन्मान यांचा सुंदर संगम नागरिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी ८९७५९२२०२०, ९७६५१९१५१३ आणि ९११२९९२००० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



















Join Our Whatsapp Group