हिंजवडी (Pclive7.com):- जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. अवजड वाहनांमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढतच चालली आहे.

हिंजवडी व आसपासच्या परिसरात हे प्रकार सातत्याने घडत असून महिलांचा बळी गेला. या अपघातानंतर डंपर चालक वाहनासह फरार झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, हिंजवडी-डांगे चौक रोड, हिंजवडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्वी ही आपले वडील सिद्धेश्वर लक्ष्मण साखरे (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीवरून जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून जात होत्या. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास, सावंत पार्क चौकात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

यावेळी डंपरच्या (एमएच १४ HU 9855) चाकाखाली आल्याने तन्वी हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे वडील किरकोळ जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.
























Join Our Whatsapp Group