पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर युवा सेना व विश्वजीत बारणे यांच्या सहकार्यातून बालदिनानिमित्त आयोजित तीनदिवसीय बालजत्रा, मनोरंजन नगरीला परिसरातील बालक, पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या तीन दिवसामध्ये दहा हजार मुलांनी या बालजत्रेचा आनंद घेतला. बालचमुंनी विविध खेळांचा आनंद लुटला.

थेरगावातील पद्मजी पेपर मिल शेजारी १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बालजत्रा पार पडली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन झाले. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीत बारणे, समन्वयक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचारणे, लोकसभा युवा सेना अध्यक्ष राजेंद्र तरस, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, युवती सेना शहरप्रमुख रितू कांबळे, शहर युवा सेना प्रमुख माऊली जगताप, माजी नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका विमल जगताप, महिला संघटिका सरिता साने, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढारकर, नाना पारखे, शैलाताई निकम, सोशल मिडीयाच्या श्वेता कापसे ,रोहिणी नवले, संगीता कदम, नारायण लांडगे, हनुमंत माळी, धनाजी बारणे, नंदू उर्फ शरद जाधव, तानाजी बारणे, दिपक गुजर, बलभिम पवार तसेच मोठ्या संख्येने युवा सैनिक व परिसरातील लहान मुले व नागरिक हे मोठ्या संखेने उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे प्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मुलांना आनंद लुटण्यासाठी बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी झुकझुक गाडी, पाण्याची बोट, जादूचे प्रयोग, पाळणे, मिकी माउस, छोटा मोठा पाळणा, सेल्फी पॉइट या खेळण्यातील वस्तूचा आनंद घेतला. थेरगाव परिसरातील पालक, बालकांनी मोठ्या संख्येने जत्रेत सहभाग घेतला. मुलांनी भरभरून जत्रेचा आनंद घेतला. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह खरंच ऊर्जा देणारा होता. या तीन दिवसामध्ये जवळपास ८ ते १० हजार मुलांनी या बालजत्रेचा आनंद घेतला.
























Join Our Whatsapp Group