पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमाला महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख
निलेश तरस, माजी नगरसेविका विमलताई जगताप, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, चिंचवड विधानसभा प्रमुख संतोष बारणे, उपशहरप्रमुख दिलीप कुसाळकर, अँड मुकुंद ओव्हाळ, संतोष सौदणकर, दीपक वाल्हेकर, सुदर्शन देसले, आकाश बारणे, सार्थक बारणे, उमेश पाटील, श्वेताताई कापसे, दीपाताई जोगदंड, गणेश पुंडे, नितीन ओव्हाळ, ओमप्रसाद परदेशी, स्वप्निल पुंडे, हरीनारायण ढोबळे, अँड. प्रवीण गायकवाड, नितीन कन्हेरे, गोपाळ राजपूत, विशाल राजपूत, भारत समाने, आदित्य माने, अथर्व खोल्लम,सुरेश लोखंडे सत्यभान दांगट, तसेच शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थितीत होते.

बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. बाळासाहेबांच्या ब्रीदवाक्य प्रमाणे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या वाक्यप्रमाणे प्रत्येक शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवावेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्यायचे,हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. त्याप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्य राहण्याच्या सूचना महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी दिल्या.

























Join Our Whatsapp Group