
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी राहुल चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंदेल यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते. या मेळाव्यात चंदेल यांना उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र देण्यात आले.

राहुल चंदेल हे विद्यार्थी दशेपासून संघटनेशी जोडले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केले आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचजविले. माजी आमदार, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली चंदेल यांचे संघटनेतील काम सुरू आहे.

शहरात पक्षाचे विचार, ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देणार असल्याचे चंदेल यांनी नियुक्तीनंतर सांगितले. उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी आमदार रामभाऊ सातपुते, आमदार महेशदादा लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे सर, बापू काटे, एकनाथदादा पवार, तुषारभाऊ हिंगे यांचे आभार चंदेल यांनी मानले आहेत.





















Join Our Whatsapp Group