पिंपरी (Pclive7.com):- पोलिसांनी किया सेल्टॉस कारमधून ४२ हजार ७९५ रुपयांची बेकायदा दारू जप्त केली. कारवाई सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर चौक, स्पाईन रोड येथे करण्यात आली.

गणेश काळुराम सोनावणे (२७, रा. तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस हवालदार चेतन दत्तात्रय सावंत यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी किया सेल्टॉस या कारमध्ये अनधिकृतपणे दारूची वाहतूक करीत होते. दरम्यान, पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता त्यात ४२ हजार ७९५ रुपये किंमतीचा देशी- विदेशी दारूचा साठा मिळून आला. चिखली पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group