पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ मधील सुदर्शननगर व कोयनानगर परिसरात भाजपाच्या सौ. निशा दिनेश यादव यांनी ‘आपुलकीचा जनसंवाद’ कार्यक्रमांतर्गत नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधत परिचय पत्रकांचे वाटप करण्यात आले.

जनसंवाद म्हणजे केवळ औपचारिक चर्चा नसून नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. या भेटीदरम्यान नागरिकांनी निशा यादव यांच्याकडे मोकळेपणाने आपली मते, समस्या व अपेक्षा मांडल्या. त्यांच्या शब्दांत व्यक्त झालेला विश्वास आणि डोळ्यांत दिसणारी आशा ही केवळ पाठिंबा नसून पुढील कार्य अधिक जबाबदारीने करण्याची प्रेरणा देणारी ठरली असल्याची भावना निशा यादव यांनी व्यक्त केली.

या जनसंवाद कार्यक्रमात सौ. निशा दिनेश यादव यांनी प्रभाग क्रमांक ११ मध्ये सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, हा विश्वासच उद्या सकारात्मक परिवर्तन घडवण्याची खरी ताकद ठरेल, अशी ठाम भावना या जनसंवादातून व्यक्त झाली.– सौ. निशा दिनेश यादवअध्यक्ष – इंद्रायणी महिला प्रतिष्ठान





















Join Our Whatsapp Group