भोसरी (Pclive7.com):- जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी प्रभाग क्रमांक २ मधील भाजपचे माजी महापौर राहुल जाधव यांच्या निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवार, दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्री संत सावतामाळी महाराज मंदिर येथे होणार आहे. “आपुला आशीर्वाद घेण्यासाठी मी येतोय” या भावनिक आवाहनासह त्यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

या प्रचार कार्यक्रमात विविध परिसरांचा समावेश करण्यात आला असून कॉलनी क्रमांक १ ते ७ बोल्हाई मळा (सकाळी १० ते ११), कॉलनी क्रमांक ८ ते १२ बोल्हाई मळा (दुपारी ११ ते १२), मधला पेठ–आहेरवाडी–सुभाष मित्र मंडळ (दुपारी १२ ते ३) तसेच सावतामाळी नगर, सहयोगनगर, दत्तनगर, गणेशनगर, रंगनाथ नगर, पंतनगर, कॉलनी क्रमांक १ ते ५ आणि किवळे मळा (दुपारी ३ ते सायंकाळी ७) या भागांमध्ये प्रचार दौरा होणार आहे.

यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा रोडमॅप मांडण्यात येणार आहे. राहुल जाधव हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर, तसेच अध्यक्ष, योगिराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था या पदांवर कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्यासाठी त्यांची ओळख आहे.
नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे जाधव यांनी सांगितले. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राहुल जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group