माऊली मळा, शरदनगर परिसरातील जनसंवाद रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रभाग क्र.११ मध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा निशा यादव यांना पाठिंबा; रॅलीमध्ये लक्षणीय उपस्थिती
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ मधील माऊली मळा शरदनगर परिसरात निशा दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनसंवाद रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीदरम्यान घरोघरी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. भाजपा नेते, आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागातील विकासासाठी ठोस प्रयत्न करणार असून नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे अशी ग्वाही या रॅलीमध्ये इंद्रायणी महिला प्रतिष्ठान अध्यक्ष निशा यादव यांनी दिली.

या जनसंवाद रॅलीत घरोघरी पत्रक वाटप करण्यात आले.माता भगिनींकडून प्रेमळ औक्षण करण्यात आले तर ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिले. तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. नागरिकांचा विश्वास हीच माझी ताकद असल्याची भावना यावेळी निशा यादव यांनी व्यक्त केली.

महिला भगिनींना निशा यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास..
इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांना प्रभाग क्रमांक ११ मधून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून रॅलीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती त्यांच्या विजयाच्या विश्वासाची पोचपावती देणारी ठरली. महिलांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात आपले प्रभावी प्रतिनिधित्व निशा यादव यांच्या माध्यमातून व्हावे असा निर्धार व्यक्त केला त्यांच्या माध्यमातून प्रभागातील महिलांचे प्रश्न सुटतील असा विश्वासही महिलांनी व्यक्त केला.

ज्येष्ठांनी दिला आशीर्वाद..
ज्येष्ठ नागरिकांनीही निशा यादव यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत रॅलीत सक्रिय सहभाग घेतला. प्रभाग क्रमांक ११ मधील ज्येष्ठ नागरिक संघाला वेळोवेळी निशा यादव आणि दिनेश यादव यांचे सहकार्य लाभले असून आगामी काळात ज्येष्ठ नागरिक संघाच्या विविध कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या योजनांचा पाठपुरावा त्यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला.
जनसंवाद रॅलीमधून नागरिक युवक, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा वाढता विश्वास दिसून आला. हा उस्फुर्त प्रतिसाद मनोबल वाढवणारा आहे. नागरिकांचा विश्वास आगामी काळात नक्कीच सार्थ ठरवू. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शहराला विकासाची उंची गाठता येणार आहे हे नागरिकांनी देखील ओळखले आहे. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पाणी व्यवस्थापन या सर्व गोष्टींसाठी भाजपचे “व्हिजन” डोळ्यासमोर ठेवून काम करू.– निशा दिनेश यादवअध्यक्ष, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान






















Join Our Whatsapp Group