पिंपरी (Pclive7.com):- राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना आणि समाजसुधारणेच्या कार्याला नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या वेगाने प्रगतिपथावर असून, या प्रकल्पाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

KSB चौक येथे उभारला जाणारा ‘शाहू सृष्टी’ प्रकल्प हा केवळ विकासकाम नसून, इतिहास, विचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाच्या घटना, त्यांचे समाजसुधारणेचे कार्य आणि विचारांची ताकद अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञान, भव्य म्युरल्स आणि जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून येथे साकारण्यात येत आहे.

या प्रकल्पासाठी अनुराधाताई गोरखे यांनी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नियोजन, समन्वय आणि वेळोवेळी आढावा घेत या कामाला गती देण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून आज हा प्रकल्प अंतिम टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे आणि लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी, युवक आणि नागरिकांसाठी एक प्रेरणास्थान ठरणार असून, सामाजिक समतेचे, शिक्षणाचे आणि परिवर्तनाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य यातून घडणार आहे.
“इतिहास जपणं म्हणजे केवळ भूतकाळ आठवणीत ठेवणं नाही, तर त्या इतिहासातून नव्या पिढीचं भविष्य घडवणं असतं. ‘शाहू सृष्टी’ हा प्रकल्प राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची शक्ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारला जात आहे. आज या प्रकल्पाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण करूनहा प्रकल्प नागरिकांसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
– अनुराधाताई गोरखेमाजी नगरसेविका






















Join Our Whatsapp Group