पिंपरी (Pclive7.com):- देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे गतिमान नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानेतृत्वावर विश्वास ठेवून आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील विविध राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारधारेत सहभागी होत आहेत. हा पक्षप्रवेश म्हणजे केवळ राजकीय प्रवेश नसून, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्यावर व नेतृत्वावर जनसेवकांचा वाढता विश्वास असल्याचे स्पष्ट द्योतक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांसह विविध पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असून, आज झालेला पक्षप्रवेश आमदार अमित गोरखे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच महेश लांडगे शंकर जगताप उमा खापरे आणि शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात पार पडला.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मातब्बर लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत सामील होत आहेत.

शेट्टी – बाबर कुटुंबियांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
भाजपा पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात शहरातील हॉटेल व्यावसायिक क्षेत्रात तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेल्या शेट्टी कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे, दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर, एैश्वर्या बाबर यांचे पक्षात स्वागत केले.

तसेच, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, महेश गोफणे, महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋिषी शेट्टी यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.






















Join Our Whatsapp Group