पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी आज रविवार (दि.२८) गाठीभेटी दौऱ्याचे आयोजन केले आहे. हा दौरा केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या समस्या समजून घेणे, झालेल्या विकासकामांचा आढावा घेणे आणि भविष्यातील विकासाचा ठोस रोडमॅप मांडण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

हा गाठीभेटी दौरा रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुरू होणार असून प्रभात रोड येथून प्रारंभ होईल. त्यानंतर गणेश कॉलनी, समर्थ कॉलनी (१, २, ३, ४), साई कॉलनी आणि स्वामी समर्थ मंदिर परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.

दौऱ्यादरम्यान विनोद नढे हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचना जाणून घेणार असून, “विकास बोलतो, विश्वास वाढतो” या संकल्पनेतून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.

विनोद नढे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या या गाठीभेटी दौर्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपाच्या कमळ चिन्हाखाली सक्षम नेतृत्व आणि प्रगतीचा विश्वास अधिक बळकट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group