पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवत मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. खंडोबा माळ, आकुर्डी येथील ऐश्वर्यम वेंचर, गोल्ड व कम्फर्ट सोसायटीमध्ये काल (दि.२७) सायंकाळी सात वाजता आयोजित गेट-टुगेदर कार्यक्रमात सुमारे दोन हजार महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात भाजपचे इच्छुक उमेदवार श्री. प्रसाद शंकर शेट्टी, श्री. कैलास भाऊ कुटे, सौ. मीनलताई विशाल यादव व सौ. ऐश्वर्याताई बाबर यांनी थेट मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेतल्या. सर्वच मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष भेटी, मोठ्या सभा आणि व्यापक संपर्क मोहिमेमुळे परिसरात भाजपच्या प्रचाराला जोर मिळताना दिसत आहे.

यावेळी विधानपरिषदेचे आमदार श्री. अमितजी गोरखे प्रमुख उपस्थित होते. महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तसेच कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाशशेठ बाबर, माजी नगरसेविका सौ. शारदाताई बाबर, माजी नगरसेवक उल्हासभाई शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते अजयशेठ लड्डा आणि माजी नगरसेवक राजू दुर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांसाठीच्या योजना, स्थानिक विकास, मूलभूत सुविधा आणि सुरक्षिततेबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या गेट-टुगेदर कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा प्रचार अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.






















Join Our Whatsapp Group