पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज रविवारी (दि.२८) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार थेट मैदानात उतरणार आहेत. संध्याकाळी ६ वाजता प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात येणार आहे.

प्रभाग क्रमांक १२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा भालेकर आणि चारुलता सोनवणे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी पंकज भालेकर यांनी गेल्या नऊ वर्षांत रेड झोन बाधित असतानाही अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे प्रभागात विकासाचा प्रवाह आणला. वर्षानुवर्षे प्रस्थापित राजकारणाला युवा विचार काय बदल घडवू शकतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

मागील आठवड्यापासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवत प्रचाराला गती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील विकासकामे, प्रभागातील मूलभूत सुविधा आणि पक्षावर असलेला जुना, भक्कम विश्वास या जोरावर “विश्वास जुना, राष्ट्रवादी पुन्हा” हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे प्रभाग क्रमांक १२ बरोबरच शेजारील चिखली प्रभाग क्रमांक १, ११ आणि २ मधील राजकीय वातावरण अधिक तापणार, हे निश्चित मानले जात आहे.

तळवडे – रुपीनगर परिसरातील ठळक विकासकामे
# अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने व पंकज भालेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तळवडे व रुपीनगर परिसरात अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली आहेत.
# रेड झोन बाधित मिळकतधारकांना मालमत्ता कराच्या सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
# तळवडे येथील ५९ एकर गायरान जागा पालिकेकडे हस्तांतरित; येथे बायोडायव्हर्सिटी प्रकल्पासह क्रीडा व सामाजिक उपक्रम सुरू.
# वीज उपकेंद्रासाठी MIDC कडून महावितरणला ३२ गुंठे जागा उपलब्ध; ऑफर लेटर प्राप्त.
तळवडे येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरू.
# शहरातील एकत्र कुटुंब व वडिलोपार्जित मिळकतीच्या विभाजनासाठी केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मिळकत कर प्रक्रिया सुरू.
प्रस्तावित कामे..
# वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्ते विकासाकरिता रेड झोन बाधित शेतकऱ्यांना १०० टक्के मोबदला (TDR) देण्याचा प्रस्ताव.
# तळवडे येथे महापालिकेचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी MIDC ची इमारत उपलब्ध व्हावी यासाठी मनपाने MIDC कडे प्रस्ताव सादर केला आहे.
एकूणच अजित पवार यांच्या प्रचार दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठी चालना मिळणार असून, पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणांवर याचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






















Join Our Whatsapp Group