पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात सुरू आहे. विठ्ठलवाडी, क्रांतीनगर भागातील प्रचाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा लोकांचा वाढता प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भव्य रॅली निघाली. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत केले. रांगोळ्या काढल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रभाग पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांचा पाठींबा दिवसेंदिवस वाढत आहे.

उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, प्रभागात शंभर खाटांचे कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय सुरु केले. याचा प्रभागातील मध्यमवर्गीय, गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना मोठा फायदा होत आहे. कमी पैशांत दर्जेदार उपचार मिळत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करणारी कमान उभारली. प्रभागातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले. पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसविले. प्रभागाला आदर्श प्रभाग करण्याचे आमचे चारही उमेदवारांचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी प्रभागातील जनता नक्कीच मतदानरुपी आशीर्वाद देईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.























Join Our Whatsapp Group