पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १४ काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला आकुर्डीतील शुभश्री हाऊसिंग सोसायटीच्या फेज एक, फेज दोन आणि फेज तीनने जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या प्रयत्नातून हा पाठींबा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार माजी नगरसेवक प्रमोद कुटे, विशाल काळभोर, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार अनुभवी आहे. त्यांना प्रभागातील समस्यांची जाण आहे. जनतेत मिसळतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात. सुख, दुख:त सहभागी होतात. त्यामुळे नागरिकांचा पाठिंबा वाढत असून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रभागाचे विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवारांना आकुर्डीतील शुभश्री हाऊसिंग सोसायटीच्या फेज एक, फेज दोन आणि फेज तीनने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार उच्च शिक्षित, अनुभवी, प्रभागातील समस्यांची जाण असणारे आहेत. त्यामुळे जाहीर पाठिंबा दिला असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोसायटी मधील नागरिक जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group