भाजपाचे संपूर्ण पँनेल मताधिक्याने निवडूण आणणार – आमदार शंकर जगताप
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख, विशाल नगर, कस्पटे वस्ती, वाकड प्रभाग क्र.२६ मधील भाजपाच्या उमेदवारांनी आज प्रचार प्रमुख आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते सकाळी म्हातोबा मंदीर वाकड गावठाण येथून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. प्रचार प्रमुख आ.शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शखाली संपुर्ण पँनेल प्रचंड मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास पँनेलच्या सर्व उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

शुभारंभ प्रसंगी सचिन साठे, विशालआप्पा कलाटे, वसंतनाना कलाटे, विठ्ठल तात्या कलाटे, बजरंग तात्या कलाटे, संपत विनोदे, मोहन भुमकर, आनंदा मानकर, तानाजी शेडगे, संभाजी कलाटे, सुरेश कलाटे, सोमनाथ काटे, बाळासाहेब कलाटे, राजाभाऊ मासुळकर, नंदुशेठ बालवडकर, पांडुरंग शेडगे, भगवान शेडगे, तानाजी शेडगे, शिवाजी आगळे, खंडू कलाटे, विष्णू कस्पटे, विजय कस्पटे, सचिन कलाटे, नितीन कलाटे, अमोल कलाटे, विनायक कलाटे, विजय कलाटे, उत्तम कलाटे, मनोहर कलाटे, गुलाब कलाटे, काळूराम कलाटे, दिलीप कस्पटे, रामदास कस्पटे, विकास कस्पटे, प्रसाद कलाटे, भाऊसाहेब कलाटे, विजय भुजबळ, सुरेश कळमकर, मारोती कलाटे, ज्ञानेश्वर कलाटे, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर बुचूडे, साहेबराव कस्पटे, कैलास कस्पटे, विकास मानकर, मुकेश कस्पटे, सुनिल मानकर, सचिन लोंढे, सुदेश राजे, सागर कस्पटे, सम्राट मानकर, ओंकार कस्पटे, सुधीर कस्पटे, मंगेश मानकर, सुनील कस्पटे, बाबुराव कस्पटे, धनराज बिर्दा, मनोज कस्पटे, किशोर कस्पटे, बाप्पु कस्पटे, किरण कस्पटे, नरेंद्र बरडे आदी मान्यवरांसह एकता जेष्ठ नागरीक मंडळ वाकडचे ग्रामस्थही उपस्थित होते.

हा प्रभाग पिंपरी चिंचवड शहरातील अतिशय महत्वाचा मानला जाणारा प्रभाग असून झपाट्याने विकसित झालेला प्रभाग आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरीकांच्या मुलभुत हक्कासाठी तथा प्रभागाला विकासाच्यादृष्टीने सुरक्षित करण्यासाठी मतदार ताकदीने भाजपाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या प्रभागाच्या विकासासाठी मतांचा हक्क बजावून शुभाशिर्वाद देतील,असा विश्वास यावेळी सर्वच उमेदवारांनी व्यक्त केला.
नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करतांना आमदार जगताप यांनी सांगितले की, मतदारांनी मतांचा हक्क बजावून आपल्या हक्काचा आणि विकासाची दृष्टी असलेल्या या पँनेलला प्रचंड मतांनी निवडून द्यावे जेणेकरून प्रभागाच्या विकासाला एक नवी दिशा देता येईल. याप्रसंगी ‘अ’ गटातील ॲड. विनायक गायकवाड, ‘ब’ गटातील आरती सुरेश चौंधे, ‘क’ गटातील स्नेहा रणजित कलाटे, व ‘ड’ गटातील संदीप अरूण कस्पटे या उमेदवारांसह हितचंतक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

फटाक्याची आतीषबाजी करत जल्लोषात या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर लगेचच पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. प्रभाग क्र.२६ मधील भाजपाचे उमेदवार यांच्या संपुर्ण पँनेलसह या पदयात्रेत प्रचंड जनसमुदाय सहभागी झाला होता.
ही पदयात्रा म्हातोबा मंदीर वाकड गावठाण, वाकड चौक, उत्कर्ष चौक, सम्राट चौक, वेणु नगर, कावेरी नगर, पिंक सिटी रोड, म्हातोबा चौक, छत्रपती चौक, धनराज पार्क अशी जात पुन्हा छत्रपती चौकाकडून जात मानकर चौकात या पदयात्रेचा आजच्या दिवसाच्या समारोप करण्यात आला.
या पदयात्रेदरम्यान या प्रभागातील नागरीकांनी तथा महीला भगीनींनी उस्फुर्तपणे उमेदवारारांचे औक्षण करून फुलांच्या वर्षावात मोठ्या प्रमाणात स्वागत केले.
























Join Our Whatsapp Group