पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीचे विकासाभिमुख धोरण, निर्णायक नेतृत्व आणि कामातून विश्वास निर्माण करणारी कार्यसंस्कृती पाहता शहरासह राज्यातील तरुणांचा कल वेगाने भाजपकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोकळ घोषणा, अपयशी कारभार आणि केवळ टीकेच्या राजकारणाला कंटाळलेले तरुण आता ठोस काम करणाऱ्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.

निवडणुका जाहीर होताच अनेक माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांनी भाजपवर विश्वास टाकत पक्षात प्रवेश केला आहे. हे प्रवेश कोणत्याही दबावाखाली नसून, आमदार अमित गोरखे यांच्या प्रभावी नेतृत्वावर, पारदर्शक कार्यपद्धतीवर आणि प्रभागातील ठोस विकासकामांवर ठेवलेल्या विश्वासातून झाले असल्याचे सांगण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील पदवीधर मतदारांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून विरोधकांना स्पष्ट संदेश दिला. दत्तात्रय चाफळकर, अनिकेत घोडके, विकी चाफळकर, शुभम चाफळकर, संतोष ठाकूर, अभिषेक शिरसवार, करण गायकवाड, संकेत वजीर, आर्यन क्षीरसागर, सागर धोत्रे, अनिकेत पवार, गौरव शिंदे, अनुज घोडके, अक्षय पवार आदी सुशिक्षित तरुणांनी आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत कर्तव्यपथ जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
या प्रवेशांमुळे प्रभाग क्रमांक १० मधील भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित असून विकासाच्या राजकारणाला जनतेचा निर्णायक कौल मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
























Join Our Whatsapp Group