
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक १५ मध्ये चेतन गौतम बेंद्रे व समीर दिलीप जावळकर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर काल सायंकाळी भव्य ‘आशीर्वाद पदयात्रा’ उत्साहात पार पडली. या पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवसेना उपनेते श्री. इरफानभाई सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेनेचे रुपेश कदम, दिलीप पांढरकर आणि राजीव मेनन यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा संपन्न झाली. पदयात्रेचा शुभारंभ ओम शिवतेज मित्र मंडळ येथून करण्यात आला असून, प्रभागातील एल. आय. जी. कॉलनी येथे तिची सांगता झाली.

पदयात्रेदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उमेदवारांना पाठिंबा दिला. नागरिकांच्या सहभागातून आगामी निवडणुकीतील जनतेचा कौल स्पष्टपणे दिसून आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. उमेदवारांनी आजवर केलेल्या विकासकामांचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे पारडे जड मानले जात असून, विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. “विजयश्री शिवसेनेचीच!” असा निर्धार यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आला.






















Join Our Whatsapp Group