पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क किती आकारायचे याचा पूर्ण अधिकार महापालिकेला देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणा-या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या भव्य सहा मजली राष्ट्रीय संग्रहायलाच्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, जेष्ठनेते आझम पानसरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, बाबू नायर, माउली थोरात, प्रदेश नेत्या उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, अमोल थोरात आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group