पिंपरी (Pclive7.com):- पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षकपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवेज हक यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथक येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्तव्यदक्ष व पोलिस प्रशासनावर पकड असणारा अधिकारी अशी संदीप पाटील यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यात अधिक्षक म्हणून काम करताना पाटील यांनी अवैध धंदे व बेकायदा वाळु वाहतुक विरोधात कठोर भुमिका घेतली होती. आता पुणे ग्रामिण भागातील वाढती गुन्हेगारीरोखणे, अवैध्द धंदे बंद करणे, तसेच लँण्डमाफियांचे साम्राज्य उधळून लावण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे.






















Join Our Whatsapp Group