पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा, निराधार, अपंग आदी १०२ महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शन मंजूरी पत्रे वाटप पत्रे आज प्रदान करण्यात आली.
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, संघटक रोमी संधू, संजय गांधी निराधार अनुदान योजना अध्यक्ष नितीन घोलप, उत्तम कुटे, अभिजीत गोफण आदी उपस्थित होते.
यावेळी विधवा ५८, अपंग १५, एचआयव्ही बाधित १३, कर्णबधीर १, श्रावणबाळ व वृद्ध १५ नागरिकांना पेन्शन मंजूरीचे पत्रे सुपूर्द करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group