
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ‘अजितदादा अमर रहे’ अशा घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पूर्ण झाला.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडीवेळी दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेते पदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आले.






















Join Our Whatsapp Group