लोणावळा (Pclive7.com):- विसापूर गडावर रविवारी (दि.१५) दुपारी सुमारे ३ वाजता फिरायला गेलेले ११ जण रस्ता चुकल्यामुळे भरकटत राहिले. यावेळी शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू टीमने तत्पर मदत केल्यामुळे सर्वांची सुखरूप सुटका केली.

विसापूर गडावर एक ग्रुप रस्ता चुकल्याची माहिती संतोष शेलार यांना मिळाली होती. संबंधितांचा फोन नंबर व लोकेशन घेतल्यानंतर तत्काळ शिवदुर्ग मित्र लोणावळा रेस्क्यू ग्रुपवर संदेश पाठवण्यात आला. यानंतर सागर कुंभार, राहुल वाघमारे, अनिल मरगळे यांनी तातडीने घटनास्थळी रवाना होत मदतकार्य सुरू केले.

तसेच, पुरातत्व विभागाचे कर्मचारी रोहित नगिने हेदेखील गडावरून मदतीसाठी पुढे सरसावले. अल्पावधीतच रेस्क्यू पथक रस्ता चुकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचले. एकूण ११ जणांचा हा ग्रुप गडावर चुकीच्या वाटेने गेल्याने अडचणीत सापडला होता. संयमाने मार्गदर्शन करत आणि सुरक्षित वाट दाखवत सायंकाळी सुमारे सहा वाजता सर्वांना सुखरूपपणे पाटण गावात आणण्यात आले.





















Join Our Whatsapp Group