पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर सेवादल अध्यक्षपदी ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे हे पक्ष स्थापनेपासून सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मागील नऊ वर्षांपासून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे शहर फेरीवाला समिती सदस्य म्हणून कार्यरत होते. पक्षातील विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी अजित पवार यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

नियुक्तीनंतर बोलताना मोरे म्हणाले की, शहराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारिणी राज्यातील सर्वात मोठी आणि कार्यक्षम करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील. तसेच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासदृष्टिकोनाची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोरे यांच्या निवडीबद्दल पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षसंघटना अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





















Join Our Whatsapp Group