पुणे (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र आज पुन्हा अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांना सलाईन देण्यात येत आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत माहिती दिली. “आम्ही बाबांना पुन्हा रुबी क्लिनिकमध्ये दाखल करत आहोत. काही तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत असून शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.




















Join Our Whatsapp Group