पिंपरी (Pclive7.com):- प्रदुषणमुक्त पिंपरी चिंचवड शहर आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी सर्वांनी सायकल शेअरींगचा वापर करावा असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतंर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप यांचे हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
आज महापौर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास आयुक्त तथा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गटूवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, इलू बाइक्स कंपनेच सुनिल जालीहाल व रितेश राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर ते राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव पर्यंत सायकल शेअरींग मध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, नगरसदस्य विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवरांनी सायकल चालवून या मोहमेत सहभाग घेतला.
यावेळी महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
प्रस्ताविकेमध्ये आयुक्त तथा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर म्हणाले राज्य व क्रेंद्र शासनाच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी शहरामध्ये झालेला असून अल्प कालावधीत शहराचा स्मार्ट सिटी आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शहरातील नागरिक यांची फार मोठया प्रमाणात मदत झालेली आहे. नागरिकांना दैनंदीन जीवनातील त्रास कमी व्हावा त्यांचे जीवण सुखकर व्हावे यासाठी चांगल्या योजना निर्माण करण्याचा उददेश या स्मार्ट सिटी मध्ये आहे. भविष्यातील नियोजन लक्षात घेता टप्या टप्याने हे शहर स्मार्ट व सुदंर करण्या करीता सर्वांनी सहकार्य करावे भविष्यात सार्वजनिक वाहतूक सुविधेला सक्षम करावे लागेल पादचा-यासाठी फुटपाथ सुविधे बाबत व सायकल स्वरांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आलेले आहे. प्रायोगिक तत्वार ३४ ठिकाणी सायकल शेअरींग उभारण्यारत येणार असून किफायतशिर दर व ऑफरचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन या वेळी त्यांनी केले
सायकल शेअरींगचे ठिकाणे, पिंपळे सौदागर व्दारकादेश सोसायटी, साई आंगण होम्स, कुणाल आयकॉन समोर, कुंजीर गार्डन, ऍल्कोव्ह सोसायटी गेटसमोर, कुंजीर मैदान, फॅब इंडिया, कुणाल आयकॉन रोड, गुरुकुल सोसायटी इन्ट्रीगेट, साई गार्डन, गोविंद यशदा चौक बीआरटीएस, पी.के. चौक बीआरटीएस, निसर्ग निर्मीती सोसायटी बीआरटीएस, रिलायन्स फ्रेश, रहाटणी रोड राधिका शॉप, शिवाजी पुतळा चौक, महादेव मंदीर, क्रीमेटुरीयेम वॉल, आरक्षीत न ३६१ गार्डन, काटे पुरम चौक बीआरटीएस, पिंपळे गुरव जवळकर चौक बीआरटीएस, कल्पतरु सोसायटी, सेव्ह ट्री चौक, तुळजा मंदीर, डायनॉसॉर गार्डन सीमाभिंत, दापोडी रोड महाराष्ट्र बँक, शिव गणेश चौक, शिरोडे रोड ब्लयू डार्ट ऑफीस, बंटी चौक हरीओम मार्केट जवळ, काटेपूरम चौक कुंदन सुपर मार्केट, काटेपूरम फेज २, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल, रामकृष्ण चौक दक्षिण बाजू, दापोडी रोड आरक्षण क्र ३४७, गायत्री मेडीकल स्टोअर दापोडी रोड, निलम सुपर मार्केट अशी असतील.
या योजनेचा लाभ ३१ ऑगस्ट २०१८ अखेर सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना घेता येईल एका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येतील व यापुढे दर अर्धा तासाला रक्कम रुपये ५ असतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group