पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक १३ निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील हिंदू दफनभुमीच्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. सर्वत्र अस्वच्छता वाढली आहे. येत्या आठ दिवसात महापालिका प्रशासनाने या दफनभुमीची स्वच्छता करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संकल्प युवा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला आहे.
याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना संकल्प युवा प्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रबुध्द कांबळे-शिरोडकर, प्रितम बनसोडे, अतुल उबाळे, राज सोनकांबळे, संतोष सोनकांबळे, ईम्रान शेख उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत हिंदू दफनभुमी आहे. मात्र महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या दफनभुमीची दुरावस्था झाली आहे. या जागेवर खुप मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेल आहे. आताची त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की, त्या ठिकाणी जर एखादी मयत दफन करण्यासाठी आली तर त्या ठिकाणी जागाच शिल्लक नाही. थोडी जागा आहे पण त्या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेले आहे. घनदाट जंगल झाल्यासारखी स्थिती आहे. यामुळे त्या ठिकाणी एखादी मयत दफन करतानी मोठी अडचण निर्माण होत आहे. याठिकाणी आकुर्डी, निगडी, रुपीनगर, चिखली, त्रिवेणीनगर अशा विविध ठिकाणावरुन मयत येतात.
तरी महापालिका प्रशासननाने या विषयाकडे विशेष लक्ष देऊन दफन भुमीची जागा स्वच्छ करुन द्यावी. आठ दिवसात त्या ठिकाणी स्वच्छता नाही केली तर, सकंल्प प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group