पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यातील चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन मद्यधुंद तरुणींनी मध्यरात्री मोठा गोंधळ घातला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणा दोन तरूणींसह एका तरूणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलीसांसोबत अत्यंत असभ्य भाषेत वाद घालणाऱ्या या तरुणींच नाव स्मिता बाविस्कर आणि प्रिया पाटील आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या तरूणाचं नाव आकाश कोरे असं आहे. या तरूणी नृत्य कलाकार असल्याची माहिती पोलीसांनी दिलीय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री पोलीस वाल्हेकरवाडी परिसरात गस्त घालत होते. यावेळी हे तिघेजण आहेर गार्डनजवळ रस्त्यावर उभे होते. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता उडवाउडवीची, तसेच उलट उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आणि चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र तिथे आल्यानंतर या दोघींचाही पारा अधिक चढला होता. या तरूणींनी पोलीसांनाच दमबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी मद्यधुंद असलेल्या या तरूणींनी चांगलाच धिंगाणा घातला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.