पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पिंपरीगावात नगरसेवक संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त या महोत्सवाला हिंदी तसेच मराठी सिनेतारका उवतरणार आहेत. सोमवार दि.०३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पिंपरीगावातील तपोवन रोड, संदीप वाघेरे यांचे संपर्क कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार अाहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीदेखील संदीप वाघेरे युवा मंचच्यावतीने भव्य दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटा, मालिकांमधील नामवंत अभिनेत्री या महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार आहेत. यात प्रामुख्याने संदिपा धर (फेम – दबंग २), अंजना सुखानी (फेम – लाल इश्क), सारा खान (फेम – हमारी अधुरी कहानी), कश्मिरा कुलकर्णी (फेम – कँरी ऑन मराठा), सायली पाटील (फेम – गणपती बाप्पा मोरया), लेझ्ली त्रिपाटी (फेम – ओडिसा) या नामवंत अभिनेत्री, कलाकार उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाला महापौर राहुल जाधव, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, जेष्ठनेते आझम पानसरे, स्थायी सभापती ममता गायकवाड तसेच नगरसेवक नगरसेविकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. तसेच डीजे, आकर्षित ऑर्केस्ट्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक संदीप वाघेरे यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group