पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व शिक्षकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांचा सत्कार व विविध देशी जातीचा वृक्षाची लागवड करण्यात आली.
मारुंजी येथील लोकमित्र परिवार संचालित सन फ्लावर पब्लिक स्कुल येथील शिक्षकांचा सत्कार उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने तुळशीचे रोपटे देऊन करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून व डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सन फ्लावर पब्लिक स्कुलचे संस्थापक डॉ शिवाजी बुचडे, आनंद हस्य कल्बचे अध्यक्ष वासंत रामप्रकाश, राजेंद्र जयस्वाल, बच्छराम शर्मा, वाणी रमेश, सुभाष पवार, विनोद भल्ला, तात्या शिनगारे, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी, पालक उपस्थित होते.
याप्रसंगी यानिमित्ताने एक विध्यार्थी एक झाड संकल्पना राबवित उन्नतीच्या वतीने सुमारे दोनशे देशी झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय भिसे म्हणाले, जर देशाची पुढची पिढी सक्षम करायची असेल तर पाणी अडविले पाहिजे, ते योग्य प्रकारे जमिनीत जिरविले पाहिजे, तसेच मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत व ती जगविले पाहिजे. जर झाडे जंगली तर आपण जगणार आहोत अन्यथा येणाऱ्या पुढील काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे प्रत्येक विध्यार्थीनी एक झाड जगविण्याची शपथ घेतली पाहिजे, त्याच बरोबर जे शिक्षक आपलयाला घडवीत आहेत त्यांचा मान, आदर कायम आपल्या मनात पाहिजे असे ते या प्रसंगी सांगितले .





















Join Our Whatsapp Group