पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये ज्या भूमिपुत्रांच्या जमिनी प्राधिकरणात आरक्षित झाल्या त्यांना साडेबारा टक्क्यांचा परतावा देण्यासाठी व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, स्थानिक खासदार, आमदार या सर्वांच्या सहमतीने माजी निवड झाली आहे. प्राधिकरणात गरीब कामगारांना घरे देण्याची योजना लवकरच तयार करुन त्याची अंमलबजावणी करु असे आश्वासन प्राधिकरणाचे नवनियुक्त अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी आज आपल्या पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिले.
यावेळी खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, पक्षनेते एकनाथ पवार, भाजपा प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, अमित गोरखे, भाजपा शहर प्रवक्ते अमोल थोरात, खाडे यांच्या पत्नी संगिता खाडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैलाताई मोळक, माजी महापौर आर.एस. कुमार, योगेश बहल, माजी उपमहापौर शैलेजा मोरे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, केशव घोळवे, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका सीमा साबळे, योगिता नागरगोजे, अनुराधा गोरखे, अश्विनी बोबडे, शर्मिला बाबर, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भीमा बोबडे, यशवंत भोसले, श्रीधर वाल्हेकर, रघुनाथ वाघ, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, भाजपा शहर उपाध्यक्ष विजय शिनकर, दिलीप राऊत, अनुसूचित जाती सेल शहराध्यक्ष मनोज तोरडमल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष सलिम शिकलगार, मंडल अध्यक्ष अण्णा गर्जे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत अमोल थोरात आणि आभार माऊली थोरात यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group