पिंपरी (Pclive7.com):- पीएमपी प्रवासी मंच व पिंपरी चिंचवड सिटीझन्स फोरम यांच्या सौजन्याने पिंपरी चिंचवड शहरात पहिला ‘प्रवासी मेळावा’ आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार दि.१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निगडी येथील संत तुकाराम संकुलातील नॉव्हेल हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिटयूट येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासी मंच व पिंपरी चिंचवड मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रवासी, महापालिका संचालक व अधिकारी, पीएमपीएमएलते अधिकारी, पत्रकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
पुण्यात विविध ठिकाणी दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी प्रवासी मंच आयोजित केला जातो. आत्तापर्यंत १८ मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. सार्वजनिक बससेवा सक्षम करण्यासाठी सूचना देणे, प्रवासी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून तक्रारी दूर करणे, तसेच बस वापरासाठी प्रोत्साहन देणे हे मेळावा आयोजित करण्यामागची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.
शनिवारी होणाऱ्या या मेळाव्याला प्रवासी मंचविषयी माहिती, निगडी-दापोडी बीआरटी, खरेच व्यवहार्य आहे का? (फायदे व तोटे), पिंपरी चिंचवड परिसरातीलनपीएमपीएमएल बस मार्गांची व योजनांची माहिती, नागरिकांच्या प्रश्न व शंकाचे निरसन, सर्वाधिक तक्रारी/सूचना देणाऱ्या प्रवाश्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
या मेळाव्यासाठी अधिक माहितीसाठी विश्वास कदम ९४०४२२७३०९, संजय शितोळे ९८५०९५८१८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group